राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ओझर महाविद्यालयात एडस् जनजागृती

0
15

ओझर प्रतिनिधी : मराठा विद्या प्रसारक समाजाचे – कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओझर (मिग ) येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने एडस् जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्राचार्य डॉ.एस.एस.काळे विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना समाजामध्ये अनिष्ठ रूढी, परंपरा यांना मुठमाती देऊन आधुनिक पध्दतीने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावे.

माणसाला चार प्रकारचे ऋण फेडायचे असतात. त्यामध्ये मातृपितृ ऋण, गुरूकृपा ऋण , समाज ऋणाची परत फेड करत असतांना व समाजात जगत असतांना आपण समाजाचे देणे लागतो या ऋणामधून मुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी समाजऋण फेडले पाहिजे. त्याचबरोबर एडस् बद्दल जनजागृती करत असतांना मनुष्याने एकनिष्ठ असावे. कोणत्याही प्रकारच्या अमिषाला बळी न पडता आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी तरच आपले जीवन हे यशस्वी होते. कोणताही विद्यार्थी गैर मार्गाला लागू नये म्हणून प्रत्येकाने स्वयंशीस्त अंगीकारावी आणि लैंगिक मोहाला बळी न पडता आपण त्याला प्रतिकार करुन व संयम ठेवून आपले जीवन सुसंस्कारीत करावे.असे प्रतिपादन मा. प्राचार्य डॉ. एस. एस.काळे यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ डी.एस.बोराडे यांनी आपल्या प्रास्ताविकात असे म्हटले की,आधुनिक तंत्रज्ञानामुळे, मोबाईल, संगणकामुळे नको त्या गोष्टी आज मुलांना सहज पहायला मिळतात व वेगळयाच नको त्या मार्गाला भरकटतात म्हणून पालकांनी व शिक्षकांनी सजग होवून त्यासाठी त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. पुढे ते असे म्हणाले की,महाविद्यालयातील युवकांमध्ये एडस् या रोगाविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या रोगाची कारणे , लक्षणे व तो होणार नाही, याबद्दलची दक्षता आणि झाल्यावर औषधोपचार कसे करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद चोबे यांनी केले तर आभार प्रा. महाले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन कर्मचारी श्री. अरुण पवार, श्री. भास्कर हळदे, श्री. सतिश ढिकले यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here