राष्ट्रीय ऍग्रो आयडॉल पुरस्कार खालपच्या कैलास देवरे यांना

0
12

देवळा प्रतिनिधी : ऍग्रोकेअर कृषी मंच संस्थेच्या वतीने दिला जाणारा उपक्रमशील शेतकरी राष्ट्रीय ऍग्रो आयडॉल पुरस्कार खालप ता देवळा येथील सेंद्रिय गूळ उत्पादक युवा शेतकरी कैलास देवरे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला . देवरे यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

कैलास देवरे यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर समवेत पंडितराव निकम आदी छाया सोमनाथ जगताप

पुरस्कार वितरण प्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक डॉ सूर्या गुंजाळ ,कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाचे संचालक राजेंद्र निकम ,सत्यवान काशीद -पाटील ,भूषण निकम ,उल्हास बोरसे ,नाबार्ड बँकेचे व्यवस्थापक मालानी ,सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गटांनी आदींसह वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पंडितराव निकम, शेतकी संघाचे संचालक महेंद्र आहेर ,संजय साळवे आदी उपस्थित होते .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here