मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे प्रवक्ते व महाविकास आघाडीचे आक्रमक मंत्री नवाब मलिक यांना इडीकडून अटक करण्यात आली असून. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर त्यांना इडीने अटक केली आहे. मलिक यांना कोर्टात सुनावणी साठी उभे केले आहे, त्यांना अटक झाल्यानंतर त्यांचा खात्याचा कारभार कोणाकडे जाणार याची उत्सुकता लागून असून राष्ट्रवादीने तातडीची बैठक बोलावली असून त्यांचे खाते कोणाकडे देणार यावर चर्चा होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
हसन मुश्रीफ, राजेश तोटे सिल्व्हर ओकवर दाखल झाले असून जयंत पाटील देखील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम