देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत निवडणूक नाट्यमयरित्या वळण घेत आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग १३ ही लक्षवेधी लढत ठरणार अशी शक्यता असतांनाच चक्क हा प्रभाग बिनविरोध झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं राष्ट्रवादीकाँग्रेसच्या नेत्यांनी कसली परतफेड केली याची चर्चा कट्ट्यावर रंगली आहे.
१० जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक १३ मधील अर्ज दाखल केलेल्या ५ पैकी ४ उमेदवारांनी माघार घेतल्याने एकमेव अर्ज शिल्लक असलेलेले भाजपाचे आहेर अशोक संतोष यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे १७ -०० चे विजयी लक्ष गाठण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती लढवल्या जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत अशी आहे की जिथे ३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. १३ नंबर प्रभाग बिनविरोध झाल्याने नागरिक मात्र चक्रावले आहेत. निवडीच्या घोषणेची औपचारिकता बाकी असून. याआधी झालेल्या १३ जागांच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या दोन जागा बिनविरोध झालेल्या असतांना आता पुन्हा एक जागेची भर पडल्याने भाजपने तीन जागांवर निर्विवाद वर्चस्व दाखवून दिले आहे.
देवळ्याचे राजकारण चाणक्यांना चक्रावणारे
देवळा तालुक्यातील राजकारण सध्या कुठल्या वळणावर आहे याचा कयास बांधने अवघड झाले आहे. कधी सेनेचे शहराध्यक्ष भाजपाच्या गोटात ऐनवेळी एन्ट्री करता, तर कधी सूचक आम्ही सही केली नाही म्हणून सांगता, आता चक्क राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात भाजपाचे कमळ बिनविरोध खुलते, हे सर्वकाही चणक्यांना चक्रावले असच सुरू आहे. हे नेमकं केदा आहेरांच्या विकासात्मक प्रेमापोटी घडतंय की अजून काही शिजतंय हे येणाऱ्या काळात दिसेलच.
१८ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या चार प्रभागांच्या उमेदवारांना ११ जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येइल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम