राष्ट्रवादीच्या आमदाराला ‘मुस्कान’चा पुळका ; हिजाबचा समर्थन मग तेव्हा मराठा आरक्षणाला विरोध का ?

0
33

मालेगाव प्रतिनिधी : देशात हिजाब प्रकरणी वातावरण तापले असून, अनेकांनि आपली राजकीय पोळी भाजली आहे, कर्नाटकमध्ये महाविद्यालयीन ड्रेस कोडच्या निषेधार्थ जमियत उलेमा-ए-हिंदतर्फे शहरात गुरुवारी हिजाबचे (Hijab) समर्थन करण्यासाठी महिला मेळावा घेण्यात आला होता यात जमियत उलेमा-ए-हिंदने शुक्रवारी हिजाब दिवस पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मालेगाव शहराती पूर्व भागातील मुस्लिम महिलांकडून प्रतिसाद मिळाला. यात राष्ट्रवादीच्या आमदाराला हिजाबचा पुळका आला असून ते आता थेट घराला नाव देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे, यामुळे पुन्हा धर्मात तेढ वाढण्याची शक्यता बळावली आहे.

कर्नाटकातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला न घाबरता मुस्कान खान या तरुणीने अल्ला हू अकबरचा नारा देत त्यांना विरोध दर्शविला. येथील ऊर्दू घराला मुस्कान खान हिचे नाव देणार असल्याचे महापौर ताहेरा शेख यांनी सांगितले. कर्नाटकातील भाजप सरकार हिजाबसंदर्भात राजकारण करीत आहे. हिजाबचा प्रश्‍न न्यायप्रविष्ट आहे. आम्हाला न्यायालयावर विश्‍वास आहे. माजी आमदार आसीफ शेख यांच्या प्रयत्नातून शहरासाठी ऊर्दू घर उभारले आहे. अनेक मुलांसमोर न घाबरलेली शौर्या मुस्कान खान हिचे नाव देण्याचा ठराव महासभेत केला जाणार असून, सर्व सदस्यांनी नामकरणाला समर्थन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

शहरातील महिलांनी बाजाराचा दिवस असल्याने शुक्रवारी हिजाब घालूनच बाहेर पडत होत्या. दरम्यान, हिजाब दिवस पाळण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतरही शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हिजाबचे समर्थन करण्यासाठी, कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ अजीज कल्लू स्टेडियमच्या आवारात गुरुवारी महिला मेळावा झाला. मेळाव्यात मुस्लिम महिलांनी हजारोंच्या संख्येने हिजाब-बुरखा परिधान करून सहभागी झाल्या. कर्नाटकमधील आंदोलनाला पाठिंबा व भाजप शासनाचा निर्णय रद्द करावा, यासाठी हा महिला मेळावा झाला. शुक्रवारी हिजाब दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांची परवानगी न घेता महिला मेळावा घेतल्याने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस शिपाई उमेश खैरनार यांच्या तक्रारीवरून इम्तियाज अहमद इक्बाल अहमद (रा. नयापुरा), अब्दुल मलीक मोहंमद यासीन (गोल्डननगर), खालीद सिकंदर इक्बाल अहमद (नयापुरा) व मोहंमद अमीन मोहंमद फारूक (जाफरनगर) या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून चौघांच्या नेतृत्वाखाली अजीज कल्लू स्टेडियमवर कोविड व्यवस्थापन आदेशाची अवहेलना करून हजारो महिलांची गर्दी जमविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आली.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here