रायगड जिल्ह्यातील बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

0
51

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील आगरात बागमांडले बस चा अपघात झाला असून मोठी दुर्घटना घडली आहे. साखरोने फाटा येथे भीषण अपघात झाला. १६ प्रवाशी जखमी असून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडले बस येथून सकाळी सुटणाऱ्या एम. एच. १४ बीटी २७३८ गाडीचे ब्रेक फेल झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे.कार्यरत असणाऱ्या चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला आहे.महामंडळाच्या बसमध्ये तब्बल ३० प्रवासी होते.

अपघातात बस आडवी पडल्याने १६ प्रवाशी जखमी झाले. जखमींवर तात्काळ उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यातील तीन ते चार प्रवाशाना गंभीर दुखापती झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्तावरील घटना स्थळी पोलीस निरीक्षक उपस्थित होऊन वाहतूक सुरळीत चालू केले आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here