
देवळा ; तालुक्यातील माळवाडी येथील राम केटरर्सच्या वतीने (दि २१ )रोजी देवळा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले .येत्या दि ३ मे रोजी मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील माळवाडी येथील भदाणे कुटुंबाच्या राम केटरिंगच्या वतीने गुरुवारी दि २१ रोजी देवळा येथील जामा मस्जिदित इफ्तार पार्टीचे आयोजन केले .

यानिमित्ताने हिंदू मुस्लिम बांधवात एकोप्याचे दर्शन घडले. याप्रसंगी दिनकर भदाणे ,दावल भदाणे, बाळासाहेब बागुल, प्रकाश भदाणे, तात्याभाऊ भदाणे,दिपक भदाणे, रामदास शिवदे आदींसह जामा मस्जिद ट्रस्टीचे, असलम भाई ,नइम शेख ,युनुस पठाण ,तन्वीर मणियार ,साजिद शेख,रियाज तांबोळी, अक्रम भाई,सद्दाम मणियार, रिजवाण भाई आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते . राम केटर्सच्या वतीने इफ्तार पार्टीत पुरणपोळी व आमरसाचे जेवण देण्यात येऊन दोन्ही समाजात यानिमित्ताने गोडवा जोपासण्यात आला . मनसेच्या वतीने राज्यभर मशिदीच्या भोंग्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे . मात्र , देवळ्यात इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम समाज बांधवात एकोपा कायम आल्याचे दर्शन घडले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम