द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक महामार्गावर रामेश्वर फाट्याजवळ अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असून . या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
देवळा-नाशिक महामार्गावरील रामेश्वर फाट्याजवळ आशादीप लॉन्स समोर दि.२९ रोजी अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून देवळा पोलिसांत मोटार अपघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी देवळा नाशिक महामार्गावर देवळ्याच्या दिशेने येत असलेल्या मोटार सायकल क्रमांक एम.एच.४१ बी.एफ.३५४० चा रामेश्वरफाट्याजवळ आशा दीप लॉन्स समोरच अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. मयताचे नाव विश्वास सुरेश आहिरे (वय-२८) रा.धुंदे तळवाडे ता.मालेगाव येथील असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन दाखल करण्यात आले असून मृत्यूदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
याबाबत अधिक देवळा पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण आहिरे ,पोलीस नाईक गवळी करीत आहेत.
– Edit by – Jagdish Nikam
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम