रामेश्वर हळहळले एकाच कुटुंबातील चौघे अपघातात जागीच ठार

0
50

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथे नाशिक रस्त्यावर हॉटेल दुर्गा जवळ चार चाकी ईर्टीका व मोटार सायकल यांच्यात आज सांयकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जागिच ठार झाले.

अपघातात चक्काचूर झालेली बाईक

याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील रामेश्वर येथील रहिवाशी असलेले हिरे कुटुंबातील गोपीनाथ साळूबा हिरे (४२), आपल्या कुटुंबासह पिंपळगाव (वा) येथून शेतीचे काम आटोपून रामेश्वर येथे जात असतांना दुर्गा हॉटेल शेजारी नाशिक कडून देवळ्याकडे येत असलेल्या चार चाकी इर्टीका (क्रमांक एम.एच.४३-ए.एल-३००९) ने गोपीनाथ यांच्या मोटार सायकल (क्रमांक एम.एच, — ४१ –के –५६६१) यांच्यात झालेल्या भिषण अपघातात गोपीनाथ साळूबा हिरे(वय४२), यांच्यासह पत्नी मंगलाबाई गोपिनाथ हिरे (३५),मुलगा गोरख गोपीनाथ हिरे(१६) हे जागीच ठार झाले.

तर मुलगी जागृती गोपिनाथ हिरे (१८) ही गंभीर जखमी झाली असून तीला अधिक उपचारासाठी मालेगाव येथे नेत असतांना मृत्यू झाला. दरम्यान रात्री उशिरा देवळा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल कृरण्याचे काम चालू होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here