द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्र अंधारात जाणार अशी चिन्हं दिसू लागली आहेत. राज्यात अनेक वीजनिर्मिती केंद्रांवर दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याने, राज्य लोड शेडिंगच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीद्वारे राज्यात 24 तास वीज असेल, वीज मोफत देऊ अशा केलेल्या बतावण्या आता पार विरून गेलेल्या दिसून येत आहेत. कारण, वीज मोफत आणि 24 तास तर जाऊद्या, पण आता ती लोड शेडिंगच्या स्वरूपात वितरित केली जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्यात निर्माण झालेल्या कोळशाच्या तुटवड्याने आता राज्यात वीजनिर्मिती खंडित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लोड शेडिंग सुरू होण्याची भीती आहे. म्हणून राज्य पुन्हा अंधारात जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम