द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राज्यात सुमारे 77 टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. तर 38 टक्के नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. राज्यात ऑक्टोंबर पासून कमी झालेल्या लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढला असून, यात प्रामुख्याने दुसरी मात्रा घेण्यासाठी प्रतिसाद वाढला आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे 30 लाख नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे.
राज्यात ऑक्टोंबर पासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यावर लसीकरणाचा वेगही मंदावला. त्यामुळे ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दैनंदिन सरासरी सात ते आठ लाख नागरिकांना लस देण्यात येत होती. परंतु शेवटच्या आठवड्यापासून मात्र लसीकरणाचा आलेख सरासरी चार ते पाच लाख नागरिकांपर्यंत कमी झाला आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणखी घट झाला आणि दिवाळीपूर्वी सुमारे अडीच ते तीन लाख नागरिकांना लस दिली गेली दिवाळीच्या दिवसांत सणामुळे नागरिकच लसीकरणासाठी फारशी येत नसल्यामुळे या काळात फारसे लसीकरण होऊ शकले नाही.
नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यापासून पुन्हा लसीकरणाने हळूहळू वेग घेतला आहे. तिसऱ्या आठवड्यात लसीकरणाचा आलेख पुन्हा सात लाखापर्यंत येऊन पोहोचला आहे गेल्या दहा दिवसांत राज्यात सुमारे 24 लाख नागरिकांनी लसीची पहिली तर सुमारे 30 लाख नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे
नोव्हेंबर मध्ये राज्यात जवळपास 75 लाख नागरिकांच्या दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ उलटून गेली तरीही लस घेतली नसल्याचे आढळले, त्यानंतर आरोग्य विभागाने या नागरिकांचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण पुन्हा वाढत असल्याचं आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम