द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायत मध्ये 7 हजार 130 रिक्त झालेल्या पदांची पोटनिवडणूक होणार असून 21 डिसेंबर रोजी मतदान होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त मदन यांनी दिली. यामुळे विविध कारणांनी रिक्त झालेल्या जागा भरल्या जाऊन गाव कारभार जोमात सुरू होईल.
राज्यातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायत जागा 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान नामनिर्देश पत्र स्वीकारणार आहेत. तर छाननी 7 डिसेंबर रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची तारीख 9 डिसेंबर असेल त्याच दिवशी चिन्हे देखील देण्यात येतील. तर 21 डिसेंबर रोजी मतदान असेल तर निकाल 22 डिसेंबर रोजी जाहीर होईल, यामुळे राज्यात पुन्हा गुलाल उधळणार यात शंका नाही…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम