राज्यात कोरोनाची नवी नियमावली लागू

0
60

मुंबई प्रतिनिधी : राज्यात पुन्हा एकदा कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भातील नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुधारीत आदेश लागू केले. नव्या नियमावलीनुसार अधिकाधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशामुळे राज्यातील 11 जिल्ह्यांना फायदा होणार असून. यामुळे ज्या आस्थापना सुरु होतील, तेथील कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे.
तसेच तेथे येणाऱ्या ग्राहकांचेही लसीकरण आवश्यक आहे. नव्या नियमावलीमुळे मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे.

नवी नियमावली पुढीलप्रमाणे:

– सर्व राष्ट्रीय पार्क आणि सफारी, पर्यटन स्थळ पुन्हा सुरू होणार
– ऑन लाईन तिकीट बुकिंग होणार
– एस्सल वर्ल्डसारखे पार्क 50 टक्के क्षमतेने
– स्विमिंग पूल,वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु
– हॉटेल,थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
– सलून, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु
– लग्नासाठी 200 जणांना परवानगी
– अंत्यविधीसाठी कोणतीही मर्यादा आली
– सर्व कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेनं परवानगी
– स्थानिक प्रशासनाच्या वेळेनुसार बीचेस, गार्डन, पार्क खुली होणार
– अम्युजमेंट/थीम पार्क 50 टक्के उपस्थितीत खुली होणार
– वॉटर पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के उपस्थिती
– सलून आणि ब्युटी पार्लर च्या नियम प्रमाणे स्पा 50 उपस्थिती
– रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह 50 टक्के उपस्थिती
– भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के उपस्थिती
– खेळाच्या स्पर्धा लोकांची 25 टक्के उपस्थिती
– नाईट कर्फ्यू रात्री 11 ते सकाळी 5.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here