राज्यात काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल ; बघा यात तुमच्या जिल्हात काय आहेत नियम

0
132

मुंबई प्रतिनिधी : कोरोना मुळे लॉक डाऊन सदृश्य परिस्थिती आहे मात्र आता , नियमावली शिथिल करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या ही आटोक्यात आली आहे. त्या जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची परिस्थिती आहे. यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभाग आणि टास्क फोर्स सोबत बैठक घेतली. या बैठकीतीचा तपशील तसेच निर्णयांची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असल्याचं देखील त्यांनी सांगितले.या बैठकीत मुंबई लोकलसह राज्यातील कोरोना निर्बंधांबाबतही चर्चा झाली. या बैठकीतील निर्णयांची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

25 जिल्ह्यात निर्बंध शिथील होतील.त्यात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारचा समावेश आहे. या जिल्ह्यात शनिवारी दुकाने सुरु होणार आहे.

11 जिल्ह्यात निर्बंध कायम राहणार आहे. त्यात नगर जिल्ह्याचा समावेश आहे. या ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहतील.

पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्हे, कोकणातील 4 जिल्हे, मराठवाड्यातील एक तर उत्तर महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार नाही. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध शिथिल होणार नाही.तिथे रुग्णसंख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास त्या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध अधिक वाढवण्याचा देखील निर्णय घेण्याची शक्यता आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

नियमात काय असतील बदल?

– दुकानं, हॉटेल्स, मंदिरे, जीम्स सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा
– दुकाने शनिवारी चार वाजेपर्यंत चालू राहतील, रविवारी फक्त बंद राहिल
– शॉप्स, हॉटेल्स, सिनेमा ५० टक्के क्षमतेने सुरु, याठिकाणी दोन डोस पूर्ण झालेले कर्मचारी हवेत
– लग्न समारंभाबाबतच्या निर्णयातही थोडीफार शिथिलता येईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here