द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने देवळा बसस्थानकावरून ये-जा करणाऱ्या बसेस गेल्या दोन दिवसंपासून येत नसल्याने बसस्थानकात शुकशुकाट दिसून आला.
दिवाळी करून परतणाऱ्या महिलावर्गाचे तसेच कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे खूपच हाल झाले. बस बंद असल्यामुळे प्रवाश्यांना नाईलाजाने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. बस कर्मचाऱ्यांचा संपाची संधी साधत खाजगी वाहनधारकांनी जास्तीचे भाडे आकारले. संपूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती असल्याने प्रवाशांना मात्र आर्थिक भुर्दंड बसतोय तर अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय. अनेक प्रवाशांचे मात्र आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
देवळा नाशिकचे भाडे ११५ रुपये असतांना अक्षरशः अडीचशे ते तीनशे रु.घेत आणि जास्त प्रवाशी कोंबत खाजगी वाहतूकदारांनी फायदा उठवला. देवळा बसस्थानकात थांबण्याऐवजी प्रवाश्यांनी पाच कंदील व मालेगाव नाक्यावर थांबणे पसंत केले. जे वाहन आले त्याला हात देत प्रवाशी गयावया करत होते. यामुळे प्रवाश्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली. देवळा बसस्थानकावर शुकशुकाट दिसून आला. एन दिवाळीत एसटीने संप पुकारल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर यावर तोडगा निघाव व वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी प्रवाश्यांकडून होतांना दिसली.
सरकार कर्मचारी संघटना वादात प्रवाशी घामाघूम
संपूर्ण महाराष्ट्रात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात एसटी महामंडळचा लाखों रुपयांचा महसूल बुडाला आहे. ऐन सणासुदीला प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसल्याने सर्वसामान्यांचे मात्र दिवाळे निघाले आहे. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
राजकारणाचा वणवा पेटला
राज्यात कर्मचारी संपावर असतांना राजकारणाने मात्र पेट घेतला आहे. आरोप प्रत्यारोप करत भाजपा विरुद्ध सेना संघर्ष शिगेला पोहचला आहे, परिवहन खाते सेनेकडे असल्याने भाजपाला आयते कोलीत मिळाले आहे. राज्यात काहि ठिकानी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने वातावरण चिघळले आहे. हा संप लवकर मिटल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम