राज्यातील तब्बल 376 ‘एसटी’ कर्मचारी निलंबित

0
16

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) कर्मचार्‍यांचा संप संपण्याची चिन्हे दिसून येत नाहीयेत. याचाच परिपाक म्हणून सरकारने आक्रमक भूमिका घेत एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. राज्यातील 45 आगारातील 376 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

नाशिक मध्ये आज सकाळी मुंडण आंदोलन करत आंदोलक मागण्यांवर ठाम असल्याचे दिसून आले. (Agitation third day) आज तिसऱ्या दिवशी देखील नाशिक जिल्ह्यातील एकाही डेपोमधून बस बाहेर पडली नसल्याचे चित्र आहे. राज्यात सणासुदीला दिवाळीत प्रवाशांचे दिवाळे निघाले आहे. कोर्टाच्या आदेशानंतर देखील संघटना आक्रमक होत्या. यामुळे सरकारनेकडक कारवाई केली आहे.

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच आगारांचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी पुकारलेला संप हा मंगळवारी तिसऱ्या दिवशीही कायम आहे. बंद पुकारला गेल्यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या असून खिशाला मोठी कात्री लागत आहे.

नागरिक आपल्या खाजगी वाहनाने किंवा खासगी ट्रॅव्हलने प्रवास करत आहेत. मंगळवारी हा फरक दिसून येत होता. (Private Transporter) मात्र यात खाजगी प्रवासात ट्रॅव्हल्स चालकांनी भरमसाठ तिकीट वाढ केली आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे.

एन.डी. पटेल रोड (N D Patel Road) येथील परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या प्रवेश द्वारा बाहेर विविध संघटनाकडून धरणे आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाला वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी (Political parties support to the ST workers agitation) देखील आपले समर्थन दिले आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये संप पुकारल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मंगळवारी दुपारी नाशिक मधील एन.डी.पटेल रोड येथील परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालासमोर कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन करत शासनाचा निषेध करण्यात आला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here