द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राज्यातील तब्बल 8596 ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेबुवारीत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने पाऊले टाकण्यास सुरवात केली आहे. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप प्रभाग रचना 13 डिसेंबर पर्यंत करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.
3 जानेवारी पर्यंत प्रभाग रचनेवर हरकत घेता येणार आहेत. तर मधल्या वेळेत आक्षेपांवर सुनावणी होणार आहे. उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालावर जिल्हाधिकारी 28 जानेवारी रोजी आरक्षण व प्रभागावर अंतिम मान्यता देऊन स्वाक्षरी करतील. तर 2 फेब्रुवारी रोजी प्रभाग नुसार आरक्षण प्रसिद्ध केले जाईल
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक ही फेब्रुवारी महिन्यात होईल असे चित्र यातून स्पष्ट झाले आहे, यामुळे गावगाड्याचे राजकारण पुन्हा तापणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम