देवळा – शेती क्षेत्रात विविध उपक्रम राबवून भरगोस उत्पन्न घेतले व आंबा, चिकू, नारळ, पेरू, सिताफळ, सफरचंद आदी फळबागा लागवड करून शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने वाजगाव ता.देवळा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कडू देवरे यांचा सन्मान राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते आज (दि.२) में महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हसरूल, नाशिक येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी ऑनलाईन द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या व उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगनराव भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे आदी मान्यवर उपस्थित होते.
देवरे यांना मिळालेल्या सन्मानाने त्यांच्या वाजगाव गावी सर्वत्र सोशल मीडियावर देवरे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम