राखी सावंतच्या नवऱ्याची बिग बॉसच्या घरात एंट्री

1
56

किर्ती आरोटे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सध्या बिग बॉस १५ च पर्व सुरू आहे.सर्वत्र शो ची जोरदार चर्चा सुरू असली तरी टीआरपी मध्ये होणारी घट बघता शोच्या निर्मात्यांनी एक नवीन वळण दिलंय. ज्यात सिंबा नागपाल नंतर आता जय भानुशाली सह नेहा भसीन आणि विशाल कोटियानला बाहेर पडावं लागलं.

अशातच घरात राखी सावंत आणि तिचे पती रितेश ने वाइल्ड कार्ड म्हणून प्रवेश केला आहे.लग्नाच्या २ वर्षानंतर रितेश जगासमोर येत आहे.

आता बिग बॉस च्या घरातून एक छायाचित्र प्रचंड वायरल होत आहे. छायाचित्रात घरात एक अनोळखी व्यक्ती दिसत आहे. राखीचा पती रितेश असल्याचा दावा केला जातोय. बिग बॉसच्या फॅन पेजवर शेअर केलेल्या या छायाचित्रात किती तथ्य आहे, हे शोच्या टेलिकास्टनंतरच कळेल. तसे, कलर्सच्या अधिकृत साइटवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये रितेश सेहरा बांधून घरात एन्ट्री घेत आहे. तर राखी हातात पूजेचे ताट घेऊन रितेशचे बीबीच्या घरी स्वागत करताना दिसत आहे.

राखी सावंत आणि रितेश सह रश्मी देसाई आणि देवोलीना ने ही बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री केली आहे.आता शो मध्ये काय नवीन पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here