देवळा प्रतिनिधी : देवळा-कळवण रस्त्यावर रामराव हौसिंग सोसायटी परिसरात रस्त्याच्या कडेला बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेली धोकादायक झाडे अद्यापही काढले गेलेले नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. झाडे हटवण्यासाठी अनेकवेळा अर्जफाटा करण्यात आला मात्र अधिकारी टाळाटाळ करत आहेत. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनुचित प्रकार घडल्यास या हलगर्जीपणाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिकारी नागरिकांच्या मागणीला जुमानत नसल्याने नागरिकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. झाडे कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . ही मृत झाडे काढून टाकण्याची मागणी नागरिक अर्जफाटे करून करतात अधिकारी मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवतात.
सौंदाणे वघई राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. या मार्गावरील देवळा कळवण रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार असल्यामुळे कांद्याने भरलेले ट्रॅक्टर, पायी जाणारे शेतकरी तसेच नागरिकांची वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर मृत झालेली जुनी, वयस्कर वाळलेली झाडे आहेत. ही झाडे केव्हा उन्मळून पडतील, याचा नेम नसल्यामुळे वृक्ष कोसळून अपघात होऊ शकतो. ही झाडे काढून टाकण्यासाठी केलेल्या तक्रारींकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन ही धोकादायक झाडे
देवळा – कळवण रस्त्याने पहाटेच्या वेळेस शहरातील नागरिक, महिला, विद्यार्थी मॉनिंग वॉकसाठी नियमित वर्दळ असून या रस्त्यावर 3, 4 वाळलेली झाडे आहेत,या झाडांच्या वाळलेल्या फांद्या मोडून रस्त्यावर पडल्याची घटना यापूर्वी घडलेली आहे. बांधकाम विभागाने मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच हे वृक्ष काढून टाकावेत अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा निष्पाप नागरिकांना भोगावा लागू नये हीच पार्थना – पपु हिरे, देवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम