नवी दिल्ली प्रतिनिधी : रशिया आणि युक्रेनमध्ये 23 दिवसापासून युद्ध सुरु आहे. त्यामुळे अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लावले आहेत. मात्र रशियाने भारताला स्वस्त दारात क्रूड ऑईल देण्याची ऑफर दिली होती.
जागितक स्तरावर अमेरिका दबाब टाकत आहे. अमेरिकेच्या दबावाला झुगारून भारत रशियाची ऑफर स्वीकारणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर भारताने आपला निर्णय घेतला आहे.
भारत सरकारच्या दोन बलाढ्य कंपन्यांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी केली आहे. रशियाकडून इंडियन ऑईल कोर्पोरेशननंतर हिंदुस्तान पेट्रोलियमने तब्बल २० लाख बॅरेल क्रूड ऑईलची खरेदी केलेली आहे. यामुळे भारतीय ऑईल कंपन्यांवरील किंमत वाढीचा आलेला दबाब कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच देशातील इंधन दरवाढ काही कालावधीसाठी टळेल.
खरेदी केलेली हे क्रूड ऑईल थेट रशियाकडून खरेदी करण्यात आलेले नाही. रशियन ऑईलचा साठा असलेल्या एजंटांकडून खरेदी केले जात आहे. इंडियन ऑईलने गेल्याच आठवड्यात लाखो बॅरेल क्रूड ऑईल खरेदी केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा हे ऑईल भारताला २० ते २५ डॉलरने स्वस्त पडले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम