रणादेवपाडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा फडशा

0
10

देवळा प्रतिनिधी : रणादेवपाडे ता.देवळा येथील जिभाऊ यादव सोनवणे यांच्या गट नंबर ३२८ मध्ये बांधलेल्या गाईवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने एक गाय फस्त केली आहे.

विशेष म्हणजे एकाच छपराखाली त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या तीन गायी बांधलेल्या होत्या, त्यापैकी एका गाईवर मागच्या बाजूने हल्ला चढवत गाय पूर्णपणे ठार केली असुन याबाबत वनरक्षकांना कळविण्यात आले असून ते लवकरच घटनास्थळी येऊन पंचनामा करणार आहेत.

दर दोन ते तीन महिन्याच्या अंतराने बिबट्या या भागात जनावरांवर हल्ला चढवून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड सहन करावा आहे, त्यामुळे वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सध्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here