रणांगणातुन ‘एग्झिट’ नकोच सर्वसामान्यांचा आग्रह

0
27

देवळा प्रतिनिधी : देवळ्याचा राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असतांना शिवसंग्रामच्या प्रदेशाध्यक्षांची राजकिय एग्झिट ने सर्व्यांना संभ्रमात पाडले, तालुक्यात केदा आहेर यांच्या रुपाने जसा बलाढ्य सत्ताधारी आहे तसाच आक्रमक विरोधक म्हणून उदयकुमारांचे नाव घेतले जाते. या दोघ नेत्यांचे राजकीय वैर सर्वश्रुत असतांना राजकारणापलीकडील मैत्री एक आदर्श ठेवा आहे. या दोघ नेत्यांच्या चतुराईने देवळ्याचा राजकारणात रंगत आणली मात्र उदयकुमार बाहेर पडत असल्याने अनेकांना धक्का बसला.

अनेक सर्वसामान्य नागरिकांनी ‘द पॉईंट नाऊ’च्या वृत्तानंतर दादांनी राजकारणातून बाहेर जाऊ नये त्यांना यश येईल या स्वरूपाचा आग्रह धरला, अनेकांनी आमच्या अधिकृत नंबरवर msg करून दादांनी एग्झिट घेऊ नये अन्यथा तालुक्यातील राजकारण एकतर्फी असेल असा सूर आवळला मात्र हे सर्व होत असतांना अनेकांनी उदयकुमारांच्या भेटी देखील घेतल्या त्यांच्या निर्णयावर फेरविचार करावा अशा स्वरूपाची विनंती केली मात्र अद्याप उदयकुमारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

उदयकुमार आहेर ज्यावेळी लढता त्यावेळी फक्त वैक्तिक मानणारा वर्ग मतदान करत असतो, त्यांच्यासोबत तालुक्यातुन मिळणारे पक्षाचे मतदान 0 आहे. कारण ही संघटना नामधारी असून उदयकुमार आहेत म्हणून त्यांच्या संघटनेचे नाव जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे अशी परिस्थिती ग्राउंडवर असल्याने त्यांना संघर्ष जास्त करावा लागतोय अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेत आहे. उद्यकुमारांनी 20 वर्ष विनायक मेटे यांच्यासोबत काम केले मात्र नशिबी हवे तितके पडले का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

देवळा तालुक्यात राजकारण करायचे म्हटले तर भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना , काँग्रेस या सर्व पक्षांना मानणारा वर्ग तळागाळात आहे मात्र भाजपा वगळता इतर पक्षांना नेते नाहीत. ही परिस्थिती आहे. राष्ट्रवादी तालुक्यात गटातटाट
विभागली आहे. जे तो स्वार्थासाठी राजकारण करतोय. राष्ट्रवादीला भक्कम नेता मिळाल्यास भाजपाला तालुक्यातील राजकारण डोईजड होईल अशी परिस्थिती आहे.

जनतेने मतदान केले नाही म्हणून रणांगनातून वैतागून बाहेर पडावे का ? इतक्या वर्ष संघर्ष केला त्याची काय किंमत राहील याची विचार उद्यकुमारांनी करणे गरजेचे आहे. मात्र राजकीय व्यवस्थेतून बाहेर पडून जनतेवर अन्याचं होईल हे पण तितकंच खरं.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here