द पॉईंट नाऊ ब्युरो : रंगपंचमीला बेरंग करणारी बातमी सामान्य नागरिकांना सकाळी सकाळीच भेटली आहे. आधी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आणि आता घरगुती गॅस सिलिंडरचे दर 50 रूपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताने रशियाकडून कच्चे तेल स्वस्तात खरेदी केल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर लिटरमागे जवळपास 1-1 रुपयांनी वाढले. 125 हुन अधिक दिवसांनंतर हे दर वाढले.
त्यात आता घरगुती गॅसचे दर देखील 50 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, सामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे. याआधी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. त्यात आता घरगुती गॅस सिलिंडरचे देखील दर वाढवण्यात आल्याने सामान्यांना मोठा झटका बसला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम