चांदवड : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे नाशिक येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन 2022 मध्ये एसएनजेबी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल चांदवडचे योग अध्यापक तसेच योग विद्या धाम,व योगदर्शन फाउंडेशन,चांदवडचे केंद्र प्रमुख व योग प्रशिक्षक श्री.राहुल (अंबादास) भिला येवला यांना “राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने” गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ.जयलक्ष्मी सानीपीना राव, ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड व संस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
सामाजिक आरोग्यासाठी योगाच्या विविध शिबिरांच्या माध्यमातून अनेक नागरिकांची आरोग्यसेवा केली. तसेच समाधान मध्ये व योगाच्या प्रचार-प्रसाराचे उत्कृष्ट कार्य गेल्या पंचवीस वर्षांपासून नियमित करत असल्याबद्दल या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या सन्मानाबद्दल एस. एन. जे. बी. संस्थेचे अध्यक्ष बेबिलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, प्रबंध समितीचे चेअरमन अजितकुमार सुराणा, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य एम.डी कोकाटे उपप्राचार्य एम.आर. संघवी विभाग प्रमुख एस.डी संचेती, मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे समन्वयक डॉ. सुनीलकुमार बागरेचा,सुमतीलाल सुराणा,नंदकिशोर ब्रम्हेचा, प्राचार्य डॉ. अजय दहाड वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील जांगडा, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पी.पी.गाळणकर, सर्व पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
तसेच योग विद्या गुरुकुलचे कुलगुरु डॉ.विश्वास मंडलिक, योग विद्या धाम, व योगदर्शन फाउंडेशन, चांदवड, पदाधिकारी, योगशिक्षक योगसाधक, त्याचप्रमाणे चांदवड तालुक्यातील सामाजिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व मित्र परिवार यांनी राहुल येवला यांचे अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम