प्रसाद बैरागी
निफाड प्रतिनिधी : खेडलेझुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा गुरुकुल मधे 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, आर्मीतील सात जवान व गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यात लान्स नायक अमोल अशोक घोटेकर, नाईक साईनाथ सुभाष घोटेकर, नाईक चेतन सोमनाथ गीते ,कॉन्स्टेबल संपत जयराम गोधडे, कॉन्स्टेबल जीडी संतोष शंकर घोटेकर, नाईक अलीम कलीम शेख, नाईक जाकीर शेख व सोमनाथ दामोदर गोरडे,गोरख तासकर व डॉक्टर सचिन भालेराव हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने होऊन, राष्ट्रगीत व ध्वजगीत गायले गेले. त्याच बरोबर आपल्या देशाविषयीचे प्रेम व्यक्त करत, शाळेतील मुलांनी भाषणे केली. यामध्ये राधिका घोटेकर, वैष्णवी घुमरे, प्रिया पदाडे, ईश्वरी चतुर, पार्थ तासकर, श्रेया गीते,वेदिका भालेराव, प्राची काकडे,ईश्वरी रूकारी व श्रेयस गीते यांचा सहभाग होता. देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणामध्ये, सर्व सैनिक मान्यवरांनी मुलांचे कौतुक करत, आपले अनुभव कथन करत, मुलांमध्ये देशाभिमान जागृत केला.संस्थापक रवींद्र गोरडे सरांनी प्रजासत्ताक दिन,भारतीय सशस्त्र सेना,जवानांची शिस्त, आपल्या देशाची दैदीप्यमान परंपरा या विषयी माहिती देऊन, मुलांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश कर्पे, योगिता गवळी, अश्विनी घोटेकर, गायत्री घुमरे, प्रिती ताई, सोमनाथ घोडे व अशोक घोडे ह्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यानी विशेष प्रयत्न केले. कार्यकमासाठी सर्व पालक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम