देवळा प्रतिनिधी : भाजपाने राज्यात संघटन वाढीवर लक्ष केंद्रित केले असून तळागाळात पक्षाचा विस्तारासाठी पाऊले उचलली आहेत. पक्षाला अनेक ठिकाणी नव्या दमाचे पदाधिकारी देत कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम सुरू असून याचाच परिपाक म्हणून भाजपा नाशिक जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी पक्ष विस्तारासाठी पुढाकार घेत बैठकांचा दुरळा उडवला आहे
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या देवळा तालुक्यांत पद घेण्यासाठी अनेक इच्छुक असल्याने युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता होती. जिल्हाध्यक्ष आहेर यांच्या होम ग्राउंड वर चुरस दिसून आली मात्र यात मार्ग काढत संघटन कौशल्य तसेच युवकांमध्ये लोकप्रिय असे, नेतृत्व शोधत योगेश उर्फ नानू आहेर यांना या पदाची जबाबदारी दिली आहे
योगेश आहेर यांच्या भोवती युवा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने पक्षाला याचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्भूमीवर आहेर यांची नियुक्ती पक्षाला नवसंजीवनी देणारी ठरणार आहे. आहेर यांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी किशोर चव्हाण, हर्षद मोरे व अन्य पदाधिकारी उस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम