युवा मित्र संस्थेच्या मदतीने कणकापूर येथे नाला खोलीकरनास सुरवात

0
38

कणकापूर : युवा मित्र संस्था सिन्नर यांच्या अर्थसाह्याने गंधर्व नाला खोलीकरणाचे काम बापू दौलत शिंदे व युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक सागर गुंड यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

युवा मित्र संस्थेच्या CSR फंडातून हे काम होत असून यामुळे ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी मोठा फायदा होणार आहे. कणकापूर येथे या कामासाठी पाठ पुरावा युवा मित्र संस्थेकडे जगदिश शिंदे पाणी वापर संस्था व राजमाता जिजाऊ संस्था कनकापूर यांनी केला असून यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

या प्रसंगी राजमाता जिजाऊ संस्था व पाणी वापर संस्था अध्यक्ष जगदिश शिंदे, साहेबराव सावकार, शिवा बर्वे, संजू बर्वे, विजू जैन, भाऊसाहेब शिंदे, रवी बर्वे, सोमनाथ जगताप, विकास शिंदे, सर्व संचालक मंडळ व कनकापूर ग्रामस्थ उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here