युवराज सिंगने मैदानात उतरण्याची केली घोषणा

0
132

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : टी-२० विश्वचषक २०२१ भारतासाठी वाईट स्वप्नासारखे आहे. भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून पराभव पत्करावा लागला होता आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून ८ विकेटने पराभव झाला होता. दरम्यान, भारताचा दिग्गज फलंदाज युवराज सिंगने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.

युवराज सिंगने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये माहिती दिली आहे. त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बॉलीवूडचे प्रसिद्ध गाणे तेरी मिट्टी देखील वाजत आहे. युवीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘देवंच तुमचा रस्ता ठरवतो’. चाहत्यांच्या मागणीनुसार मी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा खेळपट्टीवर परतेन. तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. नेहमी साथ देत राहा आणि हेच खऱ्या चाहत्याचे लक्षण आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here