युद्धाची भयावह बाजू! रशियन सैनिक करताय बलात्कार आणि मारून खाताय कुत्रे?

0
10

द पॉईंट नाऊ ब्युरो : रशिया-युक्रेन युद्धामधील एक अतिशय भयावह बाजू समोर आली आहे. येथे रशियन सैनिक मुलींवर बलात्कार करत आहेत आणि कुत्रे मारून खात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

युक्रेनियन सिक्युरिटी सर्व्हिसेसने रशियन सैनिकांचा त्यांच्या नातेवाईकांशी सुरू असलेला संवाद रेकॉर्ड केला आहे. यातून अतिशय धक्कादायक बाब समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

रशियन सैनिकाने आपल्या नातेवाईकांशी संवाद साधताना त्याच्या रणगाडा चालवणाऱ्या सहकाऱ्यांनी 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे सांगितल्याचे या ऑडिओ क्लिपमधून समोर आल्याचे बोलले जात आहे. तर त्यांनी मांस खायची इच्छा झाली म्हणून कुत्रे मारून खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एक रशियन सैनिकाला तुम्हाला जेवण चांगले मिळते का विचारल्यावर, आम्ही कुत्रा मारून खाल्ला. रोजच्या मिळणाऱ्या त्याच-त्याच जेवणाला कंटाळलो होतो. म्हणून मांस खाण्याची इच्छा झाल्याने कुत्रा मारून खाल्ल्याचे या रशियन सैनिकाने बोलल्याचे ऑडिओ क्लिप मध्ये समोर आल्याचे बोलले जात आहे.

आत्तापर्यंत युक्रेनद्वारे रशियन सैनिक क्रूर वागत आहेत, बलात्कार करत आहेत असे आरोप करण्यात आले होते. आता रशियन सैनिकांची त्यांच्या ग्रामीण भाषेतील ऑडिओ क्लिप समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. आणि यातून झालेला संवाद अतिशय धक्कादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.

आता यात नेमके काय सत्य आहे? खरी बाजू कोणती आणि खोटी बाजू कोणती? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here