पुणे प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी व पिंपरी चिंचवड मनपा भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मला एक दिवसाचा मनपा आयुक्त करा अशी मागणी रयत संघटनेचे रविराज काळे यांनी पिंपरीचिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांना पत्राद्वारे केली आहे.
रयत विद्यार्थी परिषदेणे पत्रात म्हटले आहे, की आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे आयुक्त म्हणून येऊन एक वर्ष झाले आहे . तरी सुद्धा आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका सुता सारखी सरळ करता आली नाही . आपण आल्यानंतर ही भ्रष्टाचाराचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पालिकेतील नगरसेवक विद्यार्थी आणि नागरिक आपल्या चिडखोर स्वभावामुळे आपल्याला बोलण्यास घाबरतात. ते आपले प्रश्न निर्भयपणे आपल्यापाशी मांडून सुद्धा न्याय मिळाला नाही किंवा त्या प्रकरणात कारवाई करण्यात आली नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आपण मला एक दिवसासाठी मनपा आयुक्त करा अशा आशयाचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.
एक दिवस आयुक्त होऊन हे करायचे रविराजला…
1) स्मार्ट सिटीच्या कामातील 500ते 700 कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करता येत नसेल तर मला एक दिवसासाठी मनपा आयुक्त करा मी चौकशी करून कारवाई करून दाखवतो.
2) शहरातील वसाहतीतील (झोपडपट्टी तील) नागरिकांना 25-25 वर्षे हक्काची घरे का मिळत नाहीत हे प्रकल्प (SRA )प्रकल्प वर्षांनुवर्षे का रखडतायत या संदर्भात आपण काही करू शकत नसाल तर मला एक दिवसासाठी मनपा आयुक्त करा मी सर्वांना हक्काची घरे मिळवून देतो.
3) शहरातील प्रमुख नद्या इंद्रायणी, पवना या नद्यांना गटारीचे स्वरूप कधी ,कसे आणि का आले . नदी सुधार प्रकल्पांतील भ्रष्टाचार संदर्भात कारवाई करता येत नसेल तर मला एक दिवसासाठी मनपा आयुक्त करा मी कारवाई करून दाखवतो.
4) कोविड काळात स्पर्श हॉस्पिटलला एकही रुग्ण ऍडमिट नसताना उपचाराच्या नावाखाली कोट्यावधीची बिले अदा करणाऱ्या बोगस अतिरिक्त आयुक्त अजित पवार या प्रकरणातील दोषींवर तुम्हाला कारवाई करता येत नसेल तर मला एक दिवसासाठी मनपा आयुक्त करा मी कारवाई करून दाखवतो.
5) वृक्ष गणनेचे कामकाज करणाऱ्या ठेकेदार कंपनी टेरेकोन इकोटेक प्रा लि.या कंपनी ला काळ्या यादीमध्ये टाकावे आणि भ्रष्टाचाराची चौकशी करावी.
6) मनपाच्या शाळा, महाविद्यालय बंद असतांना अत्यावश्यक च्या नावाखाली शालेय साहित्याची खरेदी करण्यात मजगुल असणार्यांवर तुम्हाला कारवाई करता येत नसेल तर मला एक दिवसासाठी मनपा आयुक्त करा मी कारवाई करून दाखवतो.
7) शहरातील रस्ते सफाई कर्मचारी व कचरा संकलन कर्मचारी यांच्या तक्रारीनुसार आपण नेमलेल्या समितीमार्फत फक्त गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारावर कारवाई झाली. ए.जी इन्व्हयरो प्रा. लिमिटेड या ठेकेदारांवर तुम्हाला कारवाई करता येत नसेल तर मला एक एक दिवसासाठी मनपा आयुक्त करा मी कारवाई करून दाखवतो.
8)आकाशचिन्ह व परवाना विभागातील अनधिकृत होर्डिंग्ज च्या घोटाळ्याची चौकशी करावी.
9) कंत्राटी महिला कामगार यांच्या किमान वेतन दरानुसार पगार न देणाऱ्या सर्व ठेकेदारांची चौकशी करावी .
10)दोन कि.मी . फुटपाथसाठी 38 कोटी रुपयांच्या कामाची चौकशी करावी.
11) इंदोर पॅटर्न या गोड नावाखाली चाललेली उधळपट्टी थांबवावी.
12) ठेकेदाराकडून बँक खात्यात पैसे घेतलेल्या अनिल रॉय यांना निलंबित करावे.
13) जातीचे दावे अवैध ठरलेल्या 44 अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
14) मोहन नगर येथील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करावी.
15) 2018 पासून भ्रष्ट स्थायी समितीच्या निर्णयांची सीआयडीमार्फत चौकशी करावी.
16) कोरोना काळातील मृत्यूंचे ऑडिट करावे.
17) अमृत योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी.
18) स्मार्ट सिटी साठी अवैध पद्धतीने वृक्षतोड करणाऱ्या ड प्रभाग ज्युनिअर इंजिनिअर वर्षा कदम यांच्यावर कारवाई करावी.
19) पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावरील छेडछाडीचे आरोप सिद्ध असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
20) राष्ट्रवादीच्या माजी महापौरांचा पंचावन्न कोटीच्या बोगस कागदपत्रे बोगस की बँक गॅरंटी संदर्भातील ठेकेदार कंपनीला काळ यादी टाकण्यात यावे.
21) शंभर कोटींचे वसुलीचे टार्गेट ठेवलेले दोन सचिन वाजे कोण आहेत ते शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
22) थेट पद्धतीने दिलेल्या जलपर्णीच्या कामाची चौकशी करण्यात यावी आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
23) अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली करदात्यांची होणारी लूट थांबवावी
24) पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत केबल व इंटरनेट केबलचे जाळे आणि अनधिकृत फ्लेक्स हटवण्यात यावेत.
25) 244 अनधिकृत मोबाईल टॉवर अधिकृत करण्याचा खटाटोप करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे.
26) लेखापरीक्षणातील कोट्यावधीचा गैरव्यवहार उघड करता येत नसेल तर आणि दोषींवर कारवाई करता येत नसेल तर आपण मला एक दिवसासाठी मनपा आयुक्त करा.
27) 66हजार शस्त्रक्रियेनंतर ही शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त आणि त्या संबंधित भ्रष्टाचाराची चौकशी करता येत नसेल तर आपण मला एक दिवसासाठी मनपा आयुक्त करा.
हे सर्व करण्यासाठी आपण मला एक दिवसासाठी मनपा आयुक्त करा असे या पठयाने म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम