राळेगण सिद्धी : राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यात वाइन विक्रीचा निर्णय घेण्यात आला, सुपरमार्केटमध्ये वाईन (Wine) विक्रीचा निर्णय झाल्यानंतर राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीका झाली. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी उद्यापासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता मात्र ग्रामसभेच्या बैठकी नंतर उपोषण मागे घेतले आहे.
ग्रामसभा (Gramsabha) घेऊन निर्णय रद्द केल्याचे सांगितले, राळेगण सिद्धीमध्ये (Ralegan Siddhi) माध्यमांशी संवाद साधताना दारूच्या दुकानात वाईन मिळते, मग सुपरमार्केटमध्ये परवानगी देण्याचे काय कारण? असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला असून त्यांच्या भूमिकेने सरकारच्या अडचणी वाढणार आहेत.
हजारे म्हणाले की, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दारुची दुकाने आहेत, त्यात तुम्ही आणखी भर घालत आहात, तुम्हाला सर्वच लोकांना व्यसनाधीन बनवायचे आहे का?, असा संतप्त सवाल अण्णा हजारेंनी ठाकरे सरकारला केला आहे. लोक व्यसनाधीन झाले की राज्य सरकारला जे साधायचे असेल ते साधता येईल, म्हणून हा निर्णय घेतल्याची सणसणीत टीका अण्णा हजारे यांनी केली. तरुणाई जर दारूच्या आणि वाईनच्या (Wine) अधीन गेली तर आपल्या देशाचे काय होईल, याबाबत चिंता व्यक्त केली.
मी जेव्हा सरकारला निरोप पाठवला. मग त्यांची लोकं चर्चेसाठी आली. मी त्यांना फक्त इतकेच म्हटले की तुमचे मी सगळे ऐकले, आता तुम्ही सरकारला माझा एक निरोप पाठवा. तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिलेली नाही. एक्साईज विभागाचे आयुक्त मला भेटायला आले. मात्र मला त्यांच्यावर विश्वास नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाईन आमची संस्कृती नाही. तुम्ही त्याची खुल्याने विक्री करत आहात हे पाहून मला या सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही, असे उद्दिग्न होत हजारेंनी निषेध व्यक्त केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम