‘मोदींचे’ स्वप्न नाशिक ‘नोटप्रेस’ पूर्ण करणार

0
92

नाशिक प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पासपोर्ट मध्ये बदल करण्याचे संकेत दिले होते. त्या दृष्टीने त्यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या. ई-पासपोर्टचे (E-Passport) आता हे स्वप्न नाशिकरोड प्रेसमध्ये (Nashikroad Press)पूर्ण होणार आहे. या पासपोर्टच्या प्रिटींग व फिनिशिंगसाठी दोन अत्याधुनिक मशिन, दोन आठ कलर प्रिटींग मशिन, सिक्युरिटी फिचर्सचे इन्टॅग्लीओ मशिन तसेच ऑनलाईन इन्सपेक्शन सिस्टीमची (Only inspection System) गरज आहे. हे काम उच्चाधिकार समितीच्या नियंत्रणात त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी प्रेस मजदूर संघाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Union finance minister for state Dr Bhagvat karad) यांची नवी दिल्लीत (New Delhi) भेट घेऊन केली. यामुळे लवकरच ही मागणी मान्य झाल्यास नाशिक मधून डिजिटल पासपोर्टला सुरवात होईल.

देशात पासपोर्ट आयएसपी प्रेस (ISP Press) अंतर्गत पुरवले जाते. दोन अत्याधुनिक अल्टार मॉर्डन मशिन देण्याचे आणि चलनी नोटांच्या प्रेसचे आधुनिकीकरणाचे आश्वासन मंत्री डॉ. कराड यांनी दिले आहे. आता हे आश्वासन कधी पूर्ण होणार याकडे लक्ष लागून आहे.

प्रेसच्या अडचणी संदर्भात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे , प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे , उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांनी मंत्री कराड यांची दिल्लीत गेल्या आठवड्यात भेट घेतली होती यावेळी दोन्ही प्रेसच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन कराड यांनी दिल्याचे समजते.

जगदीश गोडसे यांनी पत्रकारांना सांगितले की, नोट प्रेसमधीलही मशिनरी कालबाह्य झाली आहे. इन्टॅग्लिओ चार, नंबरीगच्या तीन, कटपॅकच्या दोन व सायमल्टनचे सात मशिनचे आधुनिकीकरण केले नाही तर नोटांचा खर्च रिझर्व्ह बॅंकेच्या प्रेसपेक्षा जास्त राहील असे मंत्री कराड यांच्या निर्दशनास आणले. याच सोबत कर्मचा-यांना ओव्हर टाईमची वाढीव फरकाची थकबाकी अदा करावी. तसेच कामगारांना नवीन स्केलने इनेस्टीव्ह स्कीमचे पैसे व 2016 पासूनची थकबाकी मिळणार नसेल तर इन्सेंटीव्ह स्कीमचे वाढवलेले काम बंद केले जाईल. त्यामुळे नोटांचे उत्पादन घटेल, असे मंत्री कराड यांना सांगितले. या सर्व बाबी कराड यांनी एकूण घेतल्याची माहिती गोडसे यांनी दिली.

मजदूर संघाने मंत्र्यांना सांगितले की, 4 फेब्रुवारी 2013 पासून वारस नोकरी धोरण लागू झाले आहे. करोनामुळे दोन्ही प्रेसमधील एकूण 70 कामगारांचा मृत्यू झाला आहे. दरमहा अनेक कामगार निवृत्त होतात. रिक्तच्या पाच टक्के जागी मयत कामगारांच्या वारसांना नोकरी द्यावी असा नियम आहे. हे प्रमाण 25 टक्के करावे. वारसांना एकत्रितपणे वन टाईम सेटलमेंट अंतर्गत नोकरीवर घ्यावे. कामगार संख्या घटल्याने दोन्ही प्रेसमधील मशिन पूर्ण क्षमतेने चालवता येत नाही. त्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. बोर्डाने युनिटसाठी मंजूर केलेले मनुष्यबळ त्वरित अंमलात आणावे.

फेब्रुवारीत नाशिकरोड नोट प्रेसमधून पाच लाख किमतीचे नोटांचे बंडल गहाळ झाले होते. थेट संबंध नसतानाही दोन कामगारांना निलंबित करण्यात आले. त्यांना त्वरित कामावार घ्यावे. अन्यथा परिस्थिती संवेदनशील होऊ शकते. यावर प्रेसच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन मंत्री कराड यांनी दिले


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here