देविदास बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देशात महागाई वाढलेली त्यात अनेक कंपनीने आपले कर्मचारी कामावरून काढून टाकले यामुळे, सामान्य नागरिकांचे जगणे दिवसेंदिवस मुश्किल होतय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस निफाड युवक काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
बेरोजगारांना 2 कोटी रोजगाराची निर्मिती करून देऊ,असे फसवे आश्वासन मोदींनी दिले होते मात्र दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या ही वाढतच चालली आहे.खासगीकरण वर जोर दार भर,तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, घरगुती गॅसची दरवाढ, गॅस ग्राहकांना सबसिडी पासून वंचित ठेऊन ग्राहकांना गॅसवर ठेवले, नोटबंदी, कर्मचाऱ्यांची कपात ,यामुळे अनेक लोकांचा आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यामुळे देशातील जनता मेटाकुटीला आलेली आहे. म्हणून युवक काँग्रेसच्या वतीने हा दिन बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला व बेरोजगारांची नोंदणी करण्यात आली.
याप्रसंगी निफाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.मधुकर शेलार, निफाड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे,जिल्हा सरचिटणीस विनायक शिंदे,तालुका सरचिटणीस सुहास सुरळीकर सर, अनुसूचित सेलचे अध्यक्ष राजेश लोखंडे सर, कैलास घोडके, सरवर मुलानी,दिनेश काऊतकर, सुरज साळवे, राहुल पवार,फारूक तांबोळी, अझर पटेल, नागेश कटारे, खुशाल साळवे, रमेश वाघमारे,दुर्योधन गांगुर्डे, सागर महामिने आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
कॉग्रेस दुसरे काय करणार . त्याच्याकडून तेवढीच अपेक्षा