प्रविण आहेर
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील मेशी येथे बिबट्याचा वावर असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. २६ रोजी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला.मेशी परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर असून दि.२६ रोजी मेशी येथील शेतकरी नानाजी बाबुराव जाधव यांच्या मालकीच्या शेतजमीन गट नंबर २१ पडीत जागेवर स्वतःचे पाळीव प्राणी दोन गोऱ्ह, बैल गोठ्यात होते.
रात्री बारा ते दोनच्या सुमारास बिबट्याने एक गोऱ्हावर वर हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला असून वनरक्षक श्रीमती व्ही.एस. खरात व वनरक्षक ताराचंद देवरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. शेतकरी नानाजी जाधव यांनी सदर प्राण्याची भरपाई मिळावी यासाठी वनविभागाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून लवकरात लवकर वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम