द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर शाळा – कॉलेज सुरू झाले आहेत. मात्र एका कॉलेज मध्ये 280 हुन अधिक विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं सांगण्यात येत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने सगळीकडे एक प्रकारची स्मशान शांतता पसरली होती. अर्थात, सर्वांना घराबाहेर पडणे बंद करण्यात आले होते.
यामुळे सगळेच परिसर अगदी सामसूम झाले होते. सदैव हसरे – खेळते वातावरण असणारे शाळा, महाविद्यालये पूर्णतः बंद झाली.
मात्र आत्ता कुठे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शाळा, कॉलेज सुरू झाले होते.
मात्र यातच कर्नाटक मधील धारवाड इथल्या मेडिकल कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झाल्याने, चिंतेचे वातावरण पसरले आहे.
धारवाड येथील एस. डी. एम मेडिकल कॉलेज च्या विद्यार्थ्यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे इथलं महाविद्यालय प्रशासन चिंतीत झालं आहे.
भारतात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने, सगळीकडे शाळा, कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला
आत्ताच सगळीकडे शाळा, कॉलेज सुरू झाले. बऱ्याच मोठ्या कालावधी नंतर मुले शाळा, कॉलेज मध्ये आल्याने उत्साहित होते.
मात्र कर्नाटक मधील या बातमीने पालक वर्गाची चिंता वाढवली आहे.
कर्नाटक मधील धारवाड येथील या मेडिकल कॉलेज मध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आणि त्याच्या परिणाम स्वरूप विद्यार्थी वर्गास कोरोनाने विळखा घातला.
आधीच मोठ्या कालावधी पासून शाळा, कॉलेज बंद असल्या कारणाने, विद्यार्थी वर्गाच्या शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केली जात होती.
त्यात आता शाळा, कॉलेज सुरू झाले. तर अशा बातमीने पालक वर्गास चिंता करण्यास भाग पाडले आहे.
त्यात कर्नाटक मधील हे एक मेडिकल कॉलेज आहे. जिथे व्यवस्थितरित्या काळजी घेतली जाते. मात्र पार्टी करण्यात आल्याने, कोरोनाने इथे देखील शिरकाव केला.
कोरोनाचा प्रकोप कमी झालेला असला, तरी अद्याप तो पूर्णतः गेलेला नाही. यामुळे वारंवार काळजी घेण्याबाबत सूचना केल्या जात आहेत.
मात्र यानंतर देखील बऱ्याच ठिकाणी नियम धाब्यावर बसवले जातांना दिसतात.
त्यात आता जगभरात कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. ज्या कारणास्तव त्या त्या देशांत निर्बंध घालण्यात येत आहेत.
त्यामुळे भारतात देखील आता चिंतेचे वातावरण पसरले आहे. शाळा, कॉलेज सुरू झाले असले, तरी देखील त्या त्या ठिकाणी कोरोना बाबत नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
म्हणून आता सर्व शैक्षणिक प्रशासनांनी देखील याबाबत सर्व त्या सूचना करण्यात येऊन, काळजी घ्यायला हवी.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम