द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अहवालात असे समोर आले आहे की कोळशावर चालणारे वीज प्रकल्प हे भारतातील प्रदूषण आणि अकाली मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. यासोबतच भारतातील वायू प्रदूषण आणि हवामान बदल रोखण्यासाठी कोळशापासून इंधन बनवण्यावरील अवलंबित्व कमी करावे लागेल, असे ICMR अहवालात म्हटले आहे.
प्रदूषण आणि अकाली मृत्यूची इतर कारणे
अहवालानुसार, वीज प्रकल्प, उद्योग आणि घरांमध्ये कोळसा जाळल्यामुळे भारतात अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. औद्योगिक प्रदूषण हे भारतातील प्रदूषण आणि अकाली मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे, तर तिसरा क्रमांक म्हणजे वाहनांचा धूर. शेवटी, कोळश्याच्या राखीने होणारे प्रदूषण हे भारतातील अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे.
पीएम- २.५ मुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ९ टक्के वाढ
अहवालातील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की २०१५ च्या तुलनेत २०१९ मध्ये कोळशामुळे पीएम २.५ मुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत ९ टक्के वाढ झाली आहे. २०१९ मध्ये भारतात पीएम-२.५ प्रदूषणामुळे केवळ ९ लाख ७ हजार मृत्यू झाले. त्यापैकी १७ टक्के म्हणजे १ लाख ५७ हजार मृत्यू हे पॉवर प्लांटच्या कोळशातून बाहेर पडणाऱ्या पीएम-२.५ कणांमुळे झाले. हे मृत्यू २०१५ च्या तुलनेत ९ टक्के अधिक आहेत.
मृत्यू तर अटळ आहे मात्र या कारणामुळे आता मृत्यू होऊ शकतो हे आपल्यासाठी चकित करणारे आहे. त्यामुळे माणसाला प्रदूषण कमी करणे किती गरजेचे आहे हे कळते. मानवी जीवनमान कमी झाले तर देशाला त्याचा खूप तोटा होईल तसेच आपण ज्या प्रगतीच्या मागे धावत आहोत तीच प्रगती खुंटली जाईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम