द पॉईंट पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आजकाल मोबाईल साधन इतके वाढले आहे कि आपल्या जेवणाच्या ताटाजवळ पासून ते आपण बाथरूममध्ये जातो तेव्हा देखील हा मोबाईल आपल्यासोबत येत असतो. मात्र काही वेळा आपल्या हातून मूर्खपणा होत असतो. अशीच एक अतिमुर्ख घटना घडली आहे. अमेरिकेतील एका महिलेने पेनकिलर गोळी समजून चक्क वायरलेस हेडफोन गिळला आहे. जेव्हा तिच्या हे लक्षात आले तेव्हा वेळ निघून गेली होती आणि हेडफोन तिच्या पोटात गेला होता.
या महिलेच्या एका हातात हेडफोन आणि एका हातात गोळी होती. ती बेडवर आराम करत असतांना तिने पाण्याची बाटली उचलली आणि चक्क विचार न करता गोळी समजून हेडफोनलाच पाण्यासोबत गिळून टाकले. नंतर तिला हातात गोळी दिसल्यावर जाणीव झाली कि आपण चक्क हेडफोन गिळला आहे. नंतर सोशल मीडियावर येऊन तिने हा मूर्खपणा सांगितला यावर तिला भरपूर कमेंट्स आल्या काही कमेंट्स तिची अक्कल काढणाऱ्या होत्या तर काही कमेंट्स तिला सांत्वन देणाऱ्या होत्या. रडत रडत तिने हा सगळा प्रसंग तिच्या सोशल मीडियावर मांडला.
कार्लीने सांगितलं कि जेव्हा हि घटना घडली तेव्हा ती तिच्या मैत्रीकडे होती. तिथे तिने पेनकिलर समजून हेडफोन गिळला. नंतर ती तिच्या घराकडे निघाली असता तिने हेडफोन शोधला मात्र तो तिला मिळाला नाही, नंतर तिने हेडफोनचे लोकेशन सर्च केले तर तो हेडफोन तिच्या जवळच दाखवत होता मात्र तिला तो सापडत नव्हता. यानंतर तिने गाणे सुरु केले तर चक्क हा आवाज आपल्या पोटातून येत आहे हे तिला कळल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती स्तब्ध झाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम