मुल्हेर येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न

0
9

स्वप्निल आहिरे,
सटाणा प्रतिनिधी : मुल्हेर ता. बागलाण येथील लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने व पुरोगामी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षा व महिला बचत गटांच्या तालुकाप्रमुख माया सचितानंद येवला यांच्या संकल्पनेतून खास महिलांसाठी आरोग्य व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री उध्दवमहाराज संस्थानाच्या प्रमुख सुचिता पंडित ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ताहाराबाद ग्रामपंचायत सदस्या प्रीती कोठावदे, इनरव्हील क्लब अपेक्स सटाणा येथील अध्यक्षा योगिता शिरोरे, सचिव सुवर्णा जंगम, संस्थापक अध्यक्ष वर्षा शिरोडे, अपर्णा येवलकर, माधुरी अमृतकर, दर्शना मेतकर, प्रिया दशपुते, आशा लोखंडे, अँडव्होकेट रुपाली पंडित, आरोग्य सल्लागार सोनिका पगार, गोकुळ पगार, डॉ. मनोज क्षिरसागर, पत्रकार शरद गांगुर्डे, आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांना आपली दैनंदिन कामे करीत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यावेळी त्यांना अनेक आजारांचा ही सामना करावा लागतो. या आजारांपासून त्यांनी कशी खबरदारी घ्यावी यासंदर्भात डॉ.मनोज क्षिरसागर यांनी मार्गदर्शन केले. तसेच कर्करोग याविषयी माहिती दिली. आरोग्य सल्लागार सोनिका पगार यांनी सर्व महिलांची तपासणी करून त्याना दैनंदिन जीवनात आपला आहार कसा असावा तसेच वजन कमी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची संकल्पना माया येवला यांनी मांडली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली चंद्रकांत येवला व वैशाली सुरेश येवला यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाती नरेंद्र कोठावदे, दिपाली सुनील येवला, रजनी तुकाराम येवला, योगिता गंगाधर येवला, विद्या सुनिल येवला, निता दत्तात्रय येवला, शोभा प्रकाश येवला, रत्ना भारत येवला, दुर्गा भास्कर येवला, भाग्यश्री दिलीप अमृतकर, रत्ना माधव येवला, भारती रमेश येवला, प्रांजल नितीन कोठावदे, रुपाली सुभाष येवला, सुरेखा अशोक येवला, सिताबाई, रामदास येवला, कल्याणी येवला, यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास पूनम बागुल, सिद्धी येवला, यामिनी येवला, भाग्यश्री येवला, कलाताई सूर्यवंशी, यांच्यासह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here