मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी ३५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी

0
10

तुषार रौदळ
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील रस्ते पुलांच्या कामाबरोबरच मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी यंदा हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात ३५ कोटी २५ लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिली.

बागलाण तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्या रस्त्याच्या सुधारणा कामांसाठी ही कामे प्रस्तावित केली होती. या कामांना यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात त्यांना मान्यता दिल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी स्पष्ट केले.
पुरवणी अर्थसंकल्पात कोळीपाडा ते कोटबेल रस्त्यावर पुल बांधणे व रस्ता सुधारणा करणे २ कोटी ५० लाख, दगडी साकोडे ते मोठे साकोडे रस्ता बांधकाम करणे ४० लक्ष , मानुर ते गुजरात हद्द रस्त्यावर देऊळपाडा येथे पुल बांधणे ५० लक्ष, तळवाडे ते पठावे रस्त्यावर पुल बांधणे ५० लक्ष, करजखेड भावनगर रस्त्यावर पुल बांधणे ५० लक्ष, मोहळागी हतनुर हरणबारी रस्ता बांधकाम करणे ३० लक्ष, माळीवाडे देवठाणपाडे रस्ता बांधकाम करणे २० लक्ष, पठावे चिंचपाडे पिसोरे रस्ता बांधकाम करणे ५९ लक्ष, प्राजिमा ५५ ते मुंगसे वीरगावपाडा रस्ता बांधकाम करणे २५ लक्ष, निकवेल ते जोरण रस्ता बांधकाम करणे २५ लक्ष, चौंधाणे कपालेश्वर रस्ता बांधकाम करणे २५ लक्ष, जोरण ते दहिदुले रस्त्याचे बांधकाम करणे २५ लक्ष, पठावे सावरपाडे रस्त्यावर (हत्ती नदीवर पुलाचे बांधकाम करणे) ६३ लक्ष तळवाडे भवाडे रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे ७० लक्ष, जाड गौतमनगर डवरबारी रस्त्यावर पुल बांधणे ५० लक्ष ही कामे सामाविष्ट करण्यात आली आहेत.

प्रलंबित रस्त्याला मंजूरी…
शहरातील ताहराबाद रोड ते मुंजवाड या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती ताहराबाद रोड ते सुकडनाला मळगाव मुंजवाड तसेच चित्रा सिनेमा ते मळगाव रोड हा रस्ता प्रस्तावित करण्यात आल्याचे आमदार बोरसे यांनी स्पष्ट करत .पाच कोटी रुपये खर्चाच्या कामाला पुरवणी अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली असुन लवकरच या नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या कामाला लवकरच तांत्रिक बाबींची पुर्तता करण्यात येईल .त्यानंतर निविदा प्रक्रिया पुरँण करून कामाला सुरवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार चव्हाण दाम्पत्याने पाच वर्ष झोपा काढल्या आता आमदारकी गेल्यानंतर त्यांना विकासाचा पुळका आला आहे. मुल्हेर ग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून २२कोटी रुपयांच्या कामाला यापूर्वी तत्वतः मान्यता मिळुन त्यांचा नुकताच पुरवणी अर्थसंकल्पात सामाविष्ट झाले आहे. मात्र कृतिशुन्य चव्हाण दाम्पत्ये आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करत असल्याची टिका आमदार दिलीप बोरसे यांनी केली आहे.

बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील गरीब आदिवासींना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आपण वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार गेल्या ८ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णय नुसार सचिव समितीच्या बैठकीत मुल्हेर येथील ग्रामीण रुग्णालय इमारत व अधिकारी, कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकामास तत्वतः मान्यता देण्यात आल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले.आपण प्रामाणिकपणे काम करत असताना ज्यांना पाच वर्षात कोणतेही विकास कामे करता आले नाहीत ते चव्हाण दामपत्ये फुकटचे श्रेय लाटताना जनता पाहत आहे त्यांचा हा प्रकार म्हणजे मेहनत करे मुर्गा अंडे खाये फकीर असा आहे. त्यामुळे अशा नाठ्याळ मंडळीचा जनतेसमोर लवकरच बुरखा फाटेल असा इशाराही बोरसे यांनी दिला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here