मुंब्रा येथील शिळफाटा भागातील आचार गल्लीमध्ये, एम.जे कंपाऊंडमध्ये पहाटे प्लॅस्टिक भंगार गोदामांना आग लागली. आग एवढी भीषण होती की, या आगीत चार ते पाच गोदामं जळून खाक झाली आहेत. कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
या ठिकाणी मे. एम. जे. कंपाऊंड येथील एकूण १७ प्लॅस्टिक भंगार वस्तू असलेल्या पत्र्याच्या गाळ्यांना आग लागली होती. सदर घटनेत एम. जे. कंपाऊंड मालक मोहम्मद जावेद हकीमुल्ला चौधरी यांच्या मालकीच्या जागेमध्ये असलेल्या एकुण-१७ पत्र्याच्या गाळ्यांमध्ये आग लागली होती. मुंब्र्यातील आगीत कोणतीही जीवितहानी व कोणलाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी शीळ डायघर पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १ जे.सी.बी. मशीनसह व अग्निशमन दलाचे जवान तसेच नवी मुंबईचे कोपरखैराने येथील अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहन व १-जम्बो वॉटर टँकर वाहनासह दाखल झाले.मोठ्या प्रमाणात हानी झालेली नाही असल्याची माहीती समोर आली आहे.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू केले. ठाणे अग्निशमन दलाचे 7 तर नवी मुंबई अग्निशमन दलाचे 2 गाड्या आग विझवण्यासाठी वापरण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम