मुंबई प्रतिनिधी: मुंबई विद्यापीठाला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी आली आहे. विद्यापीठाच्या ईमेल आयडीवरून मार्च २०२१ चे परीक्षेचे निकालाचे कामकाज सुरू असताना. हे धमकीचे मेल आल्याचं सांगितलं जातं आहे. .यामुळे विद्यापीठ प्रशासन हादरले आहे.
धमकी देतांना विद्यापीठाचे BSC, B.com, BA, च्या सहा सेमिस्टर चे निकाल 6 च्या आत नाही लागले तर बाँम्ब स्पोटाची चित्र पाठवून विद्यापीठ उद्धवस्त करू अशी धमकी दिली होती. यामुळे हे विकृत धमकी देणारे कोण असावे याचा शोध पोलिस घेत आहेत.
आज विद्यापीठातील डाँक्टर हे आलेले मेल तपासत असताना ९ जुलै व १० जुलै रोजी दोन स्वतंत्र ईमेल आयडीहून ही धमकी आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे सध्या या प्रकरणाचा छडा लावण्याचे काम पोलीस करत आहेत.
dboee@exam.mu.ac.in व coe4you@exam.mu.ac.in
या दोन ईमेल आयडीहून बाकी माहिती लपवत आरोपींनी धमकी दिली या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून शोध सुरू केला आहे. अशी घटना ही चिंता वाढवणार असून पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम