मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर भीषण अपघात घडला आहे. गॅस टँकर विरूद्ध बाजूने जाऊन चारचाकीला धडकला. या भिषण अपघातात त्यात या कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गॅस टँकर रस्त्यावर आडवा पडल्याने या अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती झाली नाही.
खोपोली एक्झिटजवळ या दुपारी १२ वाजता हि अपघाताची घटना घडली. गॅस टँकर पुणे- मुंबई लेन मार्गावर एका कारला ठोकली आहे. टँकरमध्ये प्रोपिलिन गॅस टँकरचा आकार मोठा असल्याने त्यानेच रस्तावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर कारचा चक्कचुर झाला असुन गाडीतील ३जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गॅस टँकरचा चालक जखमी झाला. सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती आणि इतर मोठी दुर्घटना झालेली नाही. अपघातात गॅस टँकरचा चालकदेखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुणे येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
क्रेनच्या सहाय्याने टँकर उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. महामार्गावरील दोन कार या क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आल्या आहेत.खबरदारी म्हणूखोपोली अग्निशामन विभागाचे पथक घटनास्थळी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज होते. या अपघातानंतर खोपोली पोलीस, आयआरबी, देवदुत यंत्रणा अपघात स्थळी दाखल झाली आहे.खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम