द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर लोणावळ्यावरून मुंबईला जाताना पहिल्याच बोगद्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी पावणे सात वाजले तिथून ही वाहतूक थांबलेली आहे. वाहतूक ठप्प झाल्याने वाहनचालक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. परंतु सर्व सुरळीत करण्याकरिता एकही वाहतूक पोलिस रस्त्यावर दिसत नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सकाळपासून गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहे.
दरम्यान, एक्सप्रेस वेवरवरील घाटात काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरून एक एक वाहन पुढे जात आहे. परिणामी वाहनाची कोंडी झाली आहे. या हायवेवरील वाहतूक मंद गतीने सुरू झाली आहे. घाटात काम सुरू असताना काही वेळापूर्वी तिथे एक कंटेनर पलटी झाल्याची माहिती मिळाली आहे. आता हा पलटी झालेला कंटेनर बाजूला केला असून वाहतूक मंद गतीने सुरू झाली आहे. त्यामुळे चालकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम