मुंबई -गोवा महामार्गावर सोमवारी कारच्या भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक आणि दोन जण ठार झाले आहेत. तर मागच्या सीटवर बसलेले दोन जण जखमी झाले आहेत. दुभाजकावर कार आदळल्याने हा भीषण अपघात घडला आहे.
देवस्थानकरता जात असता संतोष पांडुरंग हरमळकर आणि त्याचे मित्र राणे त्यांच्यावर काळाने घाला घातला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाताना कार भरधाव वेगात होती अशातच कार रस्ता दुभाजकावर आदळली. ही कार कठड्यावर आदळल्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या कारलाही ठोकर दिली. अपघातात मृत झालेल्या दोघे मुंबईचे रहिवासी आहेत. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. सायंकाळच्या सुमारास साळीस्ते येथे संतोष हरमळकर यांचा वाहनावरील ताबा सुटला. यात चालक संतोष हरमळकर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी येताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य सुरु केली. कारमधील जखमींना बाहेर काढून कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गंभीर जखमी सुधीर राणे यांना कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. दोघांवरही रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कार अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. खारेपाटण पोलीस आणि पोलिस उपनिरीक्षक विनोद कांबळे सह पोलीस,वाहतूक पोलीस घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास करण्यात येत आहे.
संतोष पांडुरंग हरमळकर ( ४८, प्रभादेवी) आणि सुधीर अर्जून राणे (५६, अंधेरी) अशी त्यांची नावे आहेत. तर आकांक्षा संतोष हरमळकर ( २३) आणि अन्य एक जखमी झालेत. संतोष हरमळकर यांचे गाव पेडणे (गोवा) येथे आहे. रत्नागिरीहून सहाच्या सुमारास ते आपली मुलगी आकांक्षा (२३) यांच्यासह सुधीर राणे यांच्यासोबत गोवातील पेडणे येथे जात होते. त्यानंतर ते पेडणे हरमळ येथील देवस्थानला भेट देणार होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम