मुंबई – आग्रा महामार्गवर भीषण अपघात ; तिघांना चिरडले , काही जखमी

1
32

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; रात्री मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चित्त थरारक घटना घडली असून अतिशय दुःखद असा प्रसंग कुटुंबावर ओढवला आहे. एक कारचा चालक बेभान होऊन गाड्या उडवत गेला अन पुढे जाऊन कार पलटी झाली. ही कार मागून येणाऱ्या ट्रकच्या खाली आल्याने ट्रक चालकाने ब्रेक दाबला मात्र तोपर्यंत कारचा चुराडा झालेला होता. ट्रकला मागुन दहा पेक्षा जास्त वाहने एकमेकांवर धडकले. या भीषण अपघातात तीन जण ठार झाले.

हा अपघात बुधवारी (ता. 27) रात्री साडेआठच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील बिजासनी घाट ते पळासने रदरम्यान भिलटदेव जवळ घडला. अपघातात तीन जागीच ठार ते अन्य काही जण गंभीर जखमी झाले.

कारमधील तिघे ठार तर बाकी जखमी…

कार अपघातात कार पूर्णपणे ट्रकखाली चेपली गेली. कारमधील तीन जण ठार झाले असून एक गंभीर जखमी आहे. मृत व जखमी पुरुष आहेत. कारच्या नंबर प्लेटचा चुराडा झाल्याने कार व प्रवाशांविषयी अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

अति वेगामुळे अपघात…
मध्यप्रदेश मधून धुळ्याकडे येणाऱ्या बॅलेनो कार प्रचंड वेगाने एकेका वाहनाला ओव्हरटेक करीत पुढे शिरली . यात ताबा सुटल्याने कार पलटी झाली. सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावर एका बाजूची वाहतूक विस्कळीत झाली असून ती दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली आहे. यामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here