द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : जर मुंग्या आपलं वारूळ मातीच्या नाही तर सोन्याच्या कणांनी बनवत असतील तर? मुंग्यांमुळे तुम्हाला सोन्याच्या साठ्याचा एक मोठा खजिनाच सापडला तर? आश्चर्य वाटलं ना?
पण हे खरं आहे. चक्क मुंग्यांनी सोन्याचा एक मोठा साठा शोधून काढला आहे. मुंग्या वारूळ बनवून राहतात. त्या आपलं वारूळ मातीने बनवतात, हे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र बिहार मध्ये चक्क मुंग्यांमुळे सोन्याचा एक मोठा साठा सापडला आहे.
बिहार राज्याच्या जमुई जिल्ह्यातील ललमटीया आणि करमटीया येथे सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
ही बाब तशी चार दशकांपूर्वीची आहे. मात्र केंद्र सरकार द्वारे आत्ता त्या सोन्याच्या साठ्याबाबत माहिती देण्यात आल्याने ती अधिक चर्चेत आली.
त्याचं झालं असं की, या भागातील काही मेंढपाळ उन्हापासून बचाव करण्यासाठी म्हणून एका झाडाखाली थांबले होते. तर त्यांना तिथे मुंग्या वारूळ बनवत असतांना दिसल्या. त्यांनी निरखून पाहिले, तर मुंग्या ज्या मातीच्या कणांनी वारूळ बनवत होत्या, ती माती नसून सोन्याचे कण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर याची माहिती सर्वदूर पसरली. आणि त्याद्वारे ती पुरातत्व खात्यापर्यंत पोहोचली.
पुरातत्व खात्याने यानंतर संबंधित भागाची पूर्ण माहिती घेतली. संशोधन केले. तर येथे तब्बल 220 दशलक्ष टनहून अधिक सोन्याचा साठा असल्याचा अंदाज लावला जात आहे. देशातल्या सोन्याच्या 40 टक्क्यांहून अधिक साठा केवळ या दोन भागांमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे.
40 वर्षांपूर्वी हा साठा असल्याचं लक्षात आलं. आणि त्यानंतर इथे संशोधन सुरू झालं. आता या भागात खोदकाम सुरू करून सोन्याचा साठा केव्हा बाहेर काढला जातो. हे लवकरच कळेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम