आज दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे तसेच महिलांवर होणारे अत्याचार देखील वाढले आहेत त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. असाच प्रकरण आर मीरारोड येथे घडला होता. अल्पवयीन मुली सोबत झालेल्या ह्या अतिप्रसंग मुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले होते.नराधमाला मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस गुन्हे शाखा युनिट १ ने नालासोपारा येथून अटक केली आहे. अल्पवयीन मुली , महिलां सोबत अश्लील अनैतिक प्रकार अनेक वेळा केल्याने त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत.
मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात १८ एप्रिल रोजी एका ९ वर्षीय बालिकेचा बलात्कारचा गुन्हा दाखल झाला होता . पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सदर गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखेवर सोपवला होता . चौकशी दरम्यान पोलिसांनी घटनास्थळा पासून ते आरोपीच्या हालचाली पर्यंत सुमारे २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी करडी नजर ठेवून आरोपी हा घटनास्थळी येतांना नालासोपारा येथून ट्रेनने मीरारोड येथे आल्याचे समजले. फुटेज व तांत्रिक विश्लेषणच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला नालासोपारा येथून ताब्यात घेतले व बुधवारी नया नगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी अटक केलेला वासनांध आरोपी कल्पेश देवधरे वय ३० हा वाहन चालक असून तो मूळचा कांदिवली भागातील राहणार आहे . या आरोपीवरती २०११ साला पासून तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. वसईतील माणिकपूर पोईलीस ठाण्यात १ असे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत . अनेक गुन्ह्यात तो अटक झाली होती. आरोपीने असे अन्य गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. वयापासूनच त्यांनी या गुन्हेगारी प्रवृत्तीला स्वीकारले होते.अल्पवयीन मुली व महिलां सोबत अनैतिक व अश्लील प्रकार करण्याची विकृती जडली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम