
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; मिशन कवच कुंडल मोहिमेंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी डाॕ .सुधीर पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या उपकेंद्रातील गावांत कोविड लसिकरणाला सुरुवात करण्यात आली असून,या उपक्रमाला वंचित लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका सपकाळे यांनी दिली .

खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात मिशन कवच कुंडल मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी तसेच आशा स्वयंसेवका परिश्रम घेत असून, आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या खर्डे, वाजगाव, कनकापूर, रामेश्वर, मटाने, सुभाषनगर या उपकेंद्रातील गावात वाड्या , वस्त्यांवर लसीकरणापासून विंचित असलेल्या लाभार्थ्यांना भेटून त्यांचे लसीकरण करून घेण्यात येत आहे.
याकामी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच १०० टक्के लसीकरण पूर्ण होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ अलका सपकाळे यांनी दिली . याकामी आरोग्य कर्मचारी उद्धव पाटील, अनिल गवळे, श्रीमती सोनाली पाटील ,आरोग्य सहाय्यक महेश पाटील , श्रीमती सानप ,आशा सेविका सविता देवरे, मनिषा अहिरे, वनिता खैरनार, तारा निरभवणे आदींसह शिक्षक ,अंगणवाडी सेविका, मदतनीस परिश्रम घेत आहेत .
दरम्यान , 18 वर्षावरील कोविड लसीकरनाचा पहिला व दुसरा डोस बाकी असलेल्या सर्व लाभार्थींनी लवकरात लवकर आपल्या कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या लसीकरण सत्रांमध्ये भेट देऊन कोविड लसीकरण पुर्ण करुन घ्यावे तसेच लसीकरणापासुन वंचित असलेल्या सर्व लाभार्थींनी आरोग्य विभागामार्फत आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांना सर्वेक्षणात सर्वतोपरी सहकार्य करावे .फोनवरुन लसीकरणाबाबत विचारणा झाल्यास योग्य प्रकारे माहिती द्यावी व लसीकरण पुर्ण करुन घ्यावे. असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम