मिरची व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना बेदम मारहाण ; व्यापाऱ्यांची मुजोरी वाढली

0
17

जालना प्रतिनिधी : शेकऱ्यांना अनेक वेळा अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते, व्यापाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. जालन्यात मिरची व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे , जाफ्राबाद शहरातील घटना असून , हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्यापाऱ्यांची मुजोरी व्हायरल झाली आहे. जालन्यातील जाफ्राबादमध्ये मिरची कमी भावाने खरेदी वरून मिरची उत्पादक शेतकरी आणि मिरची व्यापारी यांच्यातील वाद आणखी पेटला आहे. मिरचीची बाजारपेठेत आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी कमी भावाने मिरची खरेदीला सुरुवात केलीय. गेल्या आठवड्यात ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल असणारा हिरव्या मिरचीचा भाव व्यापाऱ्यांच्या मनमानीपणामुळे अवघ्या ५०० ते १००० हजार रुपये प्रतिक्विटलवर आला आहे.

मिरची कमी भावाने का खरेदी करता असा सवाल काही मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विचारल्यानंतर मिरची व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तीन शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालन्यातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरु आहे. प्रेमसिंग धनावत,प्रसाद राजपूत,राजु धनावत अशी जखमी शेतकऱ्यांची नावं आहेत. या शेतकऱ्यांना व्यापारी बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या मारहाण प्रकरणी मात्र जाफ्राबाद पोलिसांत अजून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. व्यापाऱ्यांच्या मुजोरीला लगाम लावण्याची मागणी सर्वत्र होत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here